Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राहुल गांधींच्या घरी पोहोचले दिल्ली पोलिस!

राहुल गांधींच्या घरी पोहोचले दिल्ली पोलिस! 



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

एका पीडितेच्या लैंगिक शोषणाप्रकरणी राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीर येथे विधान केलं होतं. या प्रकरणी राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यांना या पीडितेची माहिती देण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र राहुल गांधी यांनी या नोटिशीला काहीच उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे आता दिल्ली पोलीस त्यांच्या घरी पोहोचली आहे. स्पेशल सीपी (कायदा आणि सुव्यवस्था ) सागर प्रीत हुड्डा हे राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले आहेत. 

यावेळी हुड्डा यांना माध्यमाच्या प्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले, आम्ही राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो आहोत. राहुल गांधी यांनी 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये एक विधान केलं होतं. यात्रे दरम्यान अनेक महिला मला भेटल्या. त्यांनी त्यांच्यावर बलात्कार झाल्याचं सागितलं होतं. राहुल गांधी यांच्याकडून याचीच माहिती घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण त्या महिलांना न्याय मिळावा हा आमचा हेतू आहे. 

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली होती. ही यात्रा श्रीनगरला पोहोचली होती. तेव्हा राहुल गांधी यांनी येथील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी अत्यंत धक्कादायक विधाने केली होती. महिलांचं लैंगिक शोषण होत आहे. आमच्याकडे तशा तक्रारी आल्या आहेत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. 

दिल्ली पोलिसांनी या विधानाची गंभीर दखल घेत राहुल गांधी यांना नोटीस बजावली. आम्हाला त्या महिलांचीन नावे द्या. त्यांची माहिती द्या. म्हणजे आम्हाला कारवाई करता येईल, असं पोलिसांनी या नोटिशीत म्हटलं होतं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.