Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ईडीचे पथक कोल्हापुरात तळ ठोकून!

ईडीचे पथक कोल्हापुरात तळ ठोकून!



कोल्हापूर : खरा पंचनामा

कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर ईडीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील  काही आजी माजी संचालकांची चौकशी केली होती. ईडीने जिल्हा बँकेतील पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. आता पुन्हा ईडीचे पथक कोल्हापुरात पोहचले आहे आणि तळ ठोकून आहे.

शनिवारपासून दाखल झालेले ईडीचे अधिकारी अजूनही कागलमध्ये आहेत. दुसरीकडे त्याचवेळी हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाई प्रकरणात न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीकडून सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सच पालन करत नसल्याचा दावा करत मुश्रीफ यांनी याचिका दाखल केली आहे. राजकीय विरोधक असलेले किरीट सोमय्या हे हसन मुश्रीफ यांना टार्गेट करत असल्याचा उल्लेख याचिकेत केला आहे. त्यावर त्यांना अटक न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे.

ईडीच्या पथकाने शनिवारी मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी मुश्रीफ घरात नव्हते. परंतु त्यांची घरी पत्नी आणि इतर कुटुंबीय होते. तब्बल साडे नऊ तास मुश्रीफ यांच्या घरातील कुटुंबियांची चौकशी सुरु होती. त्यावेळी हसन मुश्रीफ नॉट रिचेबल झाले होते. सोमवारी ईडीचे पथक कोल्हापुरात असताना हसन मुश्रीफ कागलमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ईडीच्या कारवाईविरोधात आपण हायकोर्टात गेल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी उच्च न्यायालयाने त्यांना दोन आठवडे अटक करण्यास मनाई केली आहे. यामुळे त्यांना अटक होणार नसली तरी त्यांची चौकशी सुरु राहणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.