बेळंकीत रस्त्याच्या वादातून डॉक्टर काकाला पुतण्याने संपवले
मिरज : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील बेळंकी येथे शेतातील वहिवाटीचा रस्ता बंद केल्याच्या वादातून डॉक्टर काकाला पुतण्याने संपवल्याची घटना घडली आहे. डोक्यात, तोंडावर व कपाळावर लोखंडी राॅडने वार करुन चुलत पुतण्याने खून केला. बेळंकी - जानराववाडी रस्त्यावर गायकवाड वस्ती, कॅनॉलजवळ गुरुवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली.
डॉ. सुनिल आप्पासाहेब गायकवाड (वय 50, रा. गायकवाड मळा, बेळंकी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी जितेंद्र सर्जेराव गायकवाड (वय 27 रा.बेळंकी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल यांचा मुलगा सत्यजित सुनिल गायकवाड यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
बेळंकीत गायकवाड मळा परिसरात पशुवैद्यकतज्ञ सुनिल गायकवाड व जितेंद्र गायकवाड या चुलत काका-पुतण्यांची शेतजमीन आहे. जमीनीत ये-जा करण्यासाठी वहिवाटीच्या रस्त्याच्या वादामुळे डॉ. सुनिल यांनी चार दिवसापूर्वी जितेंद्र याच्या शेताचा रस्ता बंद केला होता. या रागातून शुक्रवारी रात्री सुनिल गायकवाड हे दुचाकीवरुन शेताकडे येत असताना त्यांना जितेंद्रने रस्त्यावर अडवून जाब विचारला. यावेळी वादावादी होऊन चिडून जितेंद्र गायकवाड याने सुनिल गायकवाड यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला.
डोक्यात, तोंडावर व कपाळावर लोखंडी राॅडने वार केल्याने डोके फुटून सुनिल गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर जितेंद्र तेथून पळून गेला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधीक्षक अजित टीके, ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळी डाॅ. सुनिल यांची दुचाकी रस्त्यावर पडली होती. डॉ. सुनिल गायकवाड खून प्रकरणी पुतण्या जितेंद्र गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.