संजय राऊत यांना हटवून गजानन किर्तीकर यांना बनवले शिवसेनेचे संसदीय नेते
नवी दिल्ली : खरा पंचनामा
शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन खासदार संजय राऊत यांना हटवून संसदीय नेतेपदी खा. गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून माहिती दिली आहे. राऊतांना पदावरुन हटवून एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला धक्का दिला आहे.
सध्या शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेकडून किर्तीकर संसदेत व्हीप काढू शकतात. म्हणजेच, किर्तीकरांचा व्हीप संजय राऊतांनी न पाळल्यास अपात्रतेची कारवाई देखील होऊ शकते. अपात्रतेची कारवाई झाल्यास राऊतांची खासदारकीही जाऊ शकते.
संसदेत शिवसेनेच्या खासदारांचा विचार केला तर लोकसभेत एकूण 18 खासदारांपैकी शिंदेंच्या शिवसेनेसोबत 13 खासदार आहेत. तर ठाकरे गटासोबत 5 खासदार आहेत. राज्यसभेत एकूण 3 खासदार आहेत. तिन्ही खासदार ठाकरे गटाकडे आहेत. निवडणूक आयोगानं पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. या निकालानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाने हालचाली गतिमान केल्या आहेत. आता शिंदे गटाकडून संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्याऐवजी लोकसभा खासदार गजानन किर्तीकर यांची संसदेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.