Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद रद्द!

गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद रद्द!



मुंबई : खरा पंचनामा

मराठा आरक्षण विरोध, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन यामध्ये सक्रिय सहभाग घेणारे ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना राज्य बार काऊन्सिल आणि ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या माध्यमातून जोरदार धक्का बसला आहे. सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे.

डॉ. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीमुळं ही सनद रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला चिथावणी दिल्याचा आरोप सदावर्ते यांच्यावर करण्यात आला होता.

तसेच मराठा आरक्षण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मीडिया समोर चुकीची वक्तव्य केल्याचा दावा करत बार कौन्सिलकडे तक्रार करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने देखील सदावर्ते यांच्या विरोधातील शिस्तभंगाची कारवाई थांबवण्यास नकार दिला होता. त्यामुळे वकिली करत असताना त्यांनी अनेकदा नियमांचं उल्लंघन केलं असल्याने त्यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान त्यांनी एका राजकीय व्यक्तीच्या सांगण्यावरून मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावेळी त्यांनी चुकीची वक्तव्ये केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावरील हल्लाही त्यांच्या वक्तव्याने झाला असाही आरोप करण्यात आला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.