Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रेयसीसाठी मुलाने केला वडिलांचा खून

प्रेयसीसाठी मुलाने केला वडिलांचा खून



पिंपरी : खरा पंचनामा

प्रेयसी बाबत वडिलांनी अपशब्द उच्चारल्याच्या रागातून मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर वडिलांनी आत्महत्या केल्याचा बनाव रचला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन दोन भावांना अटक केली आहे. 

हा प्रकार दिघी येथे रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडला आहे. अशोक रामदास जाधव (वय 45) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताची पत्नी, मोठा मुलगा राहूल  (वय 25), लहान मुलगा अनिल (वय23) यांच्यावर गुन्हा दाखल करुन राहूल आणि अनिल याला अटक केली आहे. 

याबाबत अशोक खंडाळे (वय 55) यांनी फिर्याद दिली आहे. अनिल याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत. मयत अशोक जाधव यांनी अनिलच्या प्रेयसीबाबत अपशब्द उच्चारले होते. याचा राग मनात धरुन अनिल याने वडिलांचा गळा आवळून खून केला.

यावेळी अशोक यांच्या नाका तोंडातून फरशीवर रक्त पडले. अशोक यांच्या पत्नीने पुरावा नष्ट करण्यासाठी फरशीवर पडलेले रक्त आणि शर्ट नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तर राहूल याने घरातील फॅनला दोरी गुंडाळून वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला. पोलिसांनी केलेल्या तपासात अशोक जाधव यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.