Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'अली जनाब'ना बाळासाहेब ठाकरे यांना उत्तर द्यावे लागेल : फडणवीस

'अली जनाब'ना बाळासाहेब ठाकरे यांना उत्तर द्यावे लागेल : फडणवीस



मुंबई : खरा पंचनामा

"अली जनाब वगैरे जे काही आहे ते उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटतं का? हे त्यांना विचारा. उर्दू ही एक भाषा आहे, त्या भाषेत कोणी काही म्हटलं तर आम्हाला काही हरकत नाही. आम्ही कोणत्याही धर्माविरोधात नाही. पण आम्ही लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन जर उद्धव ठाकरे लांगुलचालन करत असतील तर त्यांना याचं उत्तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल.” असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला. ठाकरे यांच्या मालेगाव येथील सभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्यभर सभा घेत आहेत. त्यांच्या पक्षाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गमावलं आहे. अलिकडेच त्यांनी कोकणात खेड येथे मोठी सभा घेतली. त्यानंतर आता त्यांची दुसरी जाहीर सभा आज नाशिकच्या मालेगावात होणार आहे.

शिवसेनेने मालेगावात होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी केली आहे. मालेगावात ठिकठिकाणी सभेचे बॅनर लागले आहेत. मालेगाव हा मुस्लीमबहुल भाग आहे. त्यामुळे काही ठिकाणी लागलेले बॅनर हे उर्दू भाषेत आहेत. यावरून आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका सुरू आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपाने या बॅनरवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत याबाबत म्हणाले की, "एखाद्या भाषेवर या देशात बंदी आहे का? उर्दू ही या देशातली भाषा नाही का? जावेद अख्तर यांनी देशाच्या बाहेर जाऊन देशाची भूमिका मांडण्याचं काम या भाषेत केलं आहे. सत्ताधारी केवळ लोकांचं लक्ष भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मालेगावच्या सभेनं लोकांची हातभर फाटली आहे"

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.