संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला प्रकरणी दोघे ताब्यात
मुंबई : खरा पंचनामा
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लाप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या भांडूप भागातून या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली होती. त्यानंतर अखेर आज दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करत असताना काल चार अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. स्टम्प्सद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. चौघाही हल्लेखोरांनी चेहरा कपड्याने झाकला होता.
संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची हल्लेखोरांना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे यांना थोडा मार लागला आहे. या हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसैनिकांनी संताप व्यक्त केला. तर, याची माहिती समजताच शिवाजी पार्क पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला होता.
संदीप देशपांडे यांना चार जणांकडून मारहाण झाली होती. ते चौघे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. हल्ल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. मनसे नेत्यांनी हल्ल्याप्रकरणी थेट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊतांच्या चौकशीची मागणी केली आहे. तर नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्याकडे बोट दाखवलं होतं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.