सीपीआरमधील लिपिकास लाच घेताना अटक
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात परिचारिकेकडून पाच हजारांची लाच घेताना एका लिपिकास रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी ही कारवाई केली.
हुसेनबाशा कादरसाब शेख (वय ४७ रा. बुरूड गल्ली, शनिवार पेठ कोल्हापूर, मूळ रा. सोलापूर) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे. तक्रारदार परिचारिकेस पदोन्नती आणि नोकरीतील अन्य शासकीय लाभ मिळवण्यासाठी स्थायित्व प्रमाणपत्र लागणार होते. त्यासाठी परिचारिकेने जिल्हा शल्य चिकित्सकांकडे रितसर अर्ज केला होता. त्यांना वीस दिवसांपूर्वीच प्रमाणपत्र मिळाले. त्यानंतर शेख याने प्रमाणपत्र मिळवून दिल्याबद्दल परिचारिकेकडे पाच हजार रूपये लाचेची मागणी केली.
याबाबत परिचारिकेने गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शेख याने पाच हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी शेख याला पाच हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.