अनैतिक संबंधातून डोक्यात गोळी घालून तरुणाचा खून
कोल्हापूर : खरा पंचनामा
अनैतिक संबंधाच्या वादातून गावठी पिस्तूलातून डोक्यात गोळी झाडून तरुणाचा खून केल्याची घटना कागल तालुक्यातील बाळेघोल येथे घडली आहे. सोमवारी सकाळी कापशी बाळेघोल रस्त्यावरील चिरगे शेत परिसरात ही घटना घडली.
भरत बळीराम चव्हाण (वय 30) असे मृत तरुणाचे नाव आहे. खून केल्यानंतर संशयित विकास हेमंत मोहिते (वय 25 रा. बाळेघोल) स्वतःहून मुरगूड पोलीस ठाण्यात हजर झाला. विकास मोहिते याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय भरत चव्हाण याला होता. यातुनच भरत आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत वाद होत होते. अखेर चार वर्षापूर्वी भरतने पत्नीला घटस्फोट दिला होता. तेव्हापासून संशयित विकास आणि भरत यांच्यात पूर्ववैमनस्यातून वारंवार वाद होत होते. हा प्रकार मागील तीन ते चार वर्षापासून सुरु होता.
सोमवारी सकाळी भरत चव्हाण त्याचा मित्र ओंकार जाधव याच्यासोबत सेनापती कापशी हद्दीत असणाऱ्या चिरगे शेतात विहीरीवर कामासाठी जात होता. त्यावेळी विकास मोहिते याने त्या दोघांची दुचाकी आडवली. विकासने भरत याला दुचाकीवरुन खाली उतरवले व त्याच्या डोक्यात गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
मृत भरत चव्हाण याच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. तर मोहिते याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याला सहा महिन्याची मुलगी आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.