Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ठाकरे पितापुत्रासह फडणवीसांची विधानभवनात एकत्र एन्ट्री!

ठाकरे पितापुत्रासह फडणवीसांची विधानभवनात एकत्र एन्ट्री!



मुंबई : खरा पंचनामा

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे एकत्र विधानभवनात दाखल झाले. या नेत्यांची एकत्र एन्ट्री झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे, दोन्ही नेते एकमेकांसोबत हसतमुखाने संवाद करत विधानभवान दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.

आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव देखील येणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत फारकत घेतली होती. भाजपसोबत जाण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. यावरुन दोन्ही पक्षात काहीसा तणाव निर्माण झाला होता. या दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र होते.

त्यानंतर जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंड केलं. यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर यामागचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस असल्याची कबुली एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली होती. त्यानंतरही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ऐकमेकांवर टीका केली होती.

आज विधीमंडळात दोन्ही पक्षाच्या नेत्यांना एक वेगळे चित्र पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांची एकत्र एन्ट्री झाल्यानं सगळ्यांच्या नजरा या दोन्ही नेत्यांकडे लागल्या होत्या. सभागृहात प्रवेश करेपर्यंत दोघेही एकमेकांशी चर्चा करत असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोब आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.