दारू, मटणासाठी प्राचार्याने घेतली अडीच हजारांची लाच
लातूर : खरा पंचनामा
दारू आणि मटणसाठी लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लातूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याला अडीच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
राजेंद्र गिरी असे लाचखोर प्राचार्याचे नाव आहे. चार महिन्यांचा पगार काढण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून पेन्शनची फाईल नागपूर कार्यालयात पडताळणीसाठी पासवर्ड देऊन लवकर पाठविण्यासाठी लातूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याने अडीच हजारांची लाच तक्रारादारास मागितली होती.
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यामध्ये डायटचा प्राचार्य राजेंद्र गिरी याला अडीच हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत लातूर येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.