पत्नी प्रियकरासोबत पळाली म्हणून सासऱ्याला घातल्या गोळ्या!
जालना : खरा पंचनामा
पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून एकाने सासऱ्यालाच भरदिवसा गोळ्या घातल्या. यामध्ये सासऱ्याचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड शहरात बुधवारी ही घटना घडली.
पंडित भानुदास काळे असे मृत सासऱ्याचे नाव आहे. तर किशोर पवार असे संशयिताचे नाव आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रामगव्हाण येथील मूळ रहिवासी असलेल्या व सध्या आडुळ आणि नंतर पाचोड येथे स्थायिक झालेल्या किशोर शिवदास पवार याचे त्याचा मामा पंडित भानुदास काळे यांच्या मुलीसोबत लग्न झाले होते. किशोर पवार यांना चार अपत्ये आहेत.
त्यांचा संसार व्यवस्थित सुरू असताना मुलांना सोडून किशोर त्यांची पत्नी काही दिवसापूर्वी पाचोड येथील प्रियकरासोबत पळून गेली आहे. आपला सासरा पंडित काळे याने चिथावणी दिल्यानेच पत्नी पळून गेल्याचा संशय किशोर पवार यास होता. याच रागातून आज सकाळी किशोर पवार याने अंबड येथे येऊन सासऱ्यावर भरदिवसा गावठी पिस्तुलातून थेट डोक्यात दोन गोळ्या झाडल्या. सासरा जमिनीवर कोसळून गतप्राण होतांच गावठी पिस्तूलासह किशोर पसार झाला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविला आहे. संशयित पवार याच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.