लकी स्टार फुटबॉल क्लबच्या शताब्दी पूर्ती ऐतिहासिक स्मरणिकेचे प्रकाशन
क्लबच्या आजी-माजी खेळाडू, सदस्यांचा हृद्य सत्कार
मिरज : खरा पंचनामा
मिरजेतील ऐतिहासिक अशा लकी स्टार फुटबॉल क्लबला 106 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लकी स्टार फुटबॉल क्लबच्या शताब्दी महोत्सव पूर्तीनिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या आजी-माजी खेळाडू, सदस्य यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी खेळाडूंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष व लकी स्टार फुटबॉल क्लबचे अध्यक्ष संजय भोकरे, पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या पत्नी सुमनताई खाडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थित या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी लकी स्टार फुटबॉल क्लब व रेल्वे ब्लू स्टार फुटबॉल क्लबच्या जुन्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा.शरद बनसोडे, डॉ. नथानीयल ससे, डॉ. रियाज मुजावर, डॉ. विनोद परमशेट्टी, सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद, ललित ढाकणे, अकबर मकानदार, अशोक सातपुते, महमंद मणेर, सुरेश मोहिते यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जुन्या काळातील फुटबॉल खेळ गाजवणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन लकी स्टार फुटबॉल क्लबचे सचिव प्रभात हेटकाळे, बॉबी खानविलकर, अतिश अग्रवाल, अरुण लोंढे, प्रा. अभिजीत चव्हाण, संग्राम शिंदे, विजय ठाणेदार, प्रा. आकाश बनसोडे, प्रा. प्रकाश वारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली गाडवे यांनी केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.