सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यास साडेतीन लाखाची लाच घेताना अटक
नाशिक : खरा पंचनामा
सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहादा येथील कार्यकारी अभियंता महेश प्रतापराव पाटील यांना कंत्राटदाराकडून साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
याबाबत नंदुरबार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभियंता पाटील सतत तक्रारदारकडे पैशांची मागणी करीत होते. त्यामुळे कंत्राटदाराने तक्रार केली. तक्रारदार यांनी गेले सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधीत नंदुरबार जिल्हा मार्ग डांबरीकरण व डागडुजीची कामे पुर्ण केली आहेत. सध्या तक्रारदार यांच्या तीन नवीन कामांच्या निवीदा मंजुर होऊन शहादा (धुळे) येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाकडून आल्या होत्या. मात्र त्याचे कार्यरंभ आदेश देण्यात आले नाही.
कंत्राटदाराने पुर्ण केलेल्या कामांचे 3.92 कोटी रुपयांचे प्रलंबित बील तसेच प्रस्तावित 5.33 कोटींच्या कामांचे कार्यरंभ आदेश मिळावेत यासाठी पाठपुरावा केला. त्याबाबत कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी ती बीले मंजुर केली नाहीत. कार्यारंभ आदेश देखील दिले नाही. या कामांसाठी त्यांनी टक्केवारी म्हणून 43 लाख रुपयांची मागणी केली.
त्यानंतर कंत्राटदार असलेल्या तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली, त्यानुसार कार्यकारी अभियंता महेश पाटील यांना त्यांच्या शहादा येथील कार्यालयात साडो तीन लाख रुपये स्विकारताना सापळा लावून अटक करण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.