काही लोकांच्या कोठ्यावर कायदा व सुव्यवस्था नाचते : संजय राऊत
मुंबई : खरा पंचनामा
एका व्हिडिओवरून एसआयटी स्थापन केली जाते. पण, मी एका रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या एका मुलीचे फोटो ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना आवाहन केले. म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतो. एका खासदारावर, एका पत्रकारावर ही या राज्याची कायदा व सुव्यवस्था कशी कोठ्यावर नाचते काही लोकांच्या ते तुम्हाला स्पष्ट दिसते. असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.
बार्शीतील एका मुलीवर झालेल्या अत्याचाराचा फोटो संजय राऊत यांनी ट्वीट केला होता. या प्रकरणी संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राऊतांनी आज माध्यमाशी बोलताना राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.
राऊत म्हणाले, “मी कोणत्याही प्रकारे त्या मुलींचे नाव किंवा तिच्यावर झालेले इतर अत्याचाराविषयी काही बोललो नाही. फक्त माननीय मुख्यमंत्री या मुलीचे रक्त जे सांडलेले आहे. ते वाया जाऊ देऊ नका इतकेच म्हटले. यावर जर माझ्यावर गुन्हा दाखल होणार असेल. तर राज्यातील कायदा कोणत्या पद्धतीने काम करतोय. हे तुम्हाला स्पष्ट दिसेल.
राऊत म्हणाले, “मी काय चूकलो, फोटो ट्वीट केला. ज्या मुलीवर कोयत्याचे वार झालेले आहेत. त्या मुलीचे पालक माझ्याशी बोलले. त्या मुलीच्या आईने जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही. तर मला इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी ती सरकारकडे आक्रोश करून करते. तिच्या आईने मरणाची इच्छा व्यक्त केली आहे. आणि बार्शीतील काही गुंड टोळ्यांनी तिच्यावर निर्घृण हल्ला केला. अजूनही काही मुख्य आरोपी बाहेर आहेत. अशी माझी भूमिका आहे. जर मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवायचा असेल मी दिल्लीत असताना. मी ज्या माध्यमांतून पोहोचवायला हवा होता. त्या माध्यमातून मी तो पोहोचविला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.