महानिरीक्षकांच्या सुचनेनंतरही सौजन्याची ऐसीतैशी!
सांगली : खरा पंचनामा
गेल्याच आठवड्यात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची सांगलीत वार्षिक तपासणी झाली. त्यांनी नागरिक, तक्रारदार यांना सौजन्याची वागणूक द्या अशी अधिकाऱ्यांना सूचना दिली होती. मात्र त्यांनी सूचना देऊन 8 दिवसही झाले नसताना काही अधिकारी सौजन्याची ऐसीतैशी करत आहेत. अर्जाबाबत विचारणा करायला गेलेल्यांना चक्क पोलीस ठाण्यात न फिरकण्याचा दम दिला जात आहे. याची दखल कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात एकजण त्याच्या नातेवाईकाने दिलेल्या अर्जाची चौकशी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथील प्रभारी अधिकाऱ्याने त्याला अशी वागणूक दिल्याचे सांगितले. त्याच्या नातेवाईकाला त्रास होत असल्याने त्याने संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. वरिष्ठ कार्यालयासह त्या अर्जाचा प्रवास गेली 12 दिवस सुरू आहे. अर्ज कुठे अडकला याची चौकशी करण्यासाठी गेल्यावरही त्याला वाईट वागणूक दिल्याचे त्याचे म्हणणे आहे.
त्याने अर्जाबाबत माहिती काढून संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीसाठी भेटायला नातेवाईकाला पाठवले. त्याने संबंधित अधिकाऱ्यांकडे त्याची चौकशी केल्यानंतर पोलिस ठाण्यात फिरकायचे नाही असा सज्जड दमच दिला. त्यामुळे महानिरीक्षकानी 8 दिवसांपूर्वी दिलेल्या सूचनेला हरताळ फासला असेच स्पष्ट होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगूनही ठाण्यात येणाऱ्यांना सौजन्याची वागणूक मिळत नसेल तर दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न असे असंख्य पीडित विचारत आहेत.
शिवाय एका अधिकाऱ्यांनी तर एवढ्या लहान सहान गोष्टींसाठी वरिष्ठांना का भेटता असा प्रश्नही वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेरच विचारून कहरच केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.