Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबियांना उच्च न्यायालयाचा दिलासा

उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबियांना उच्च न्यायालयाचा दिलासा



मुंबई : खरा पंचनामा

उध्दव ठाकरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर बेहिशेबी मालमत्तेचा आरोप करत गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. याचवेळी गौरी भिडे यांना धक्का देत 25 हजारांचा दंडदेखील ठोठावला आहे.

गौरी भिडे यांनी उध्दव ठाकरेंविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. यात, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उत्पन्नाचा व संपत्तीचा ताळमेळ लागत नाही. यामुळे याची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांची संपत्ती भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने जमा केलेली बेहिशेबी मालमत्ता आहे. याविरोधात ११ जुलै २०२२ ला मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून आम्ही तक्रारही केली आहे, असेही याचिकाकर्त्यानी म्हंटले होते.

या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्यालाच 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.