शुटिंगवेळी अपघातात अमिताभ बच्चन जखमी
हैद्राबाद : खरा पंचनामा
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हैदराबादमध्ये जखमी झाले.
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर त्याचे हेल्थ अपडेट शेअर केले आणि सांगितले की ते सध्या त्यांच्या मुंबईतील घरी विश्रांती घेत आहे. एका अॅक्शन सीक्वेन्समध्ये अमिताभ जखमी झाले असून त्यांच्या उजव्या बरगडीचे स्नायू फाटले आहेत.
बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगवर अपडेट शेअर केले आणि सांगितले की, दुखापत झाल्यामुळे त्यांना शूट रद्द करावे लागले. आता दुखापतीतून बरे होण्यासाठी त्यांना काही आठवडे लागणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.