Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंत्रिमंडळात एकही महिला नाही : अजित पवारांची सरकारवर टीका

मंत्रिमंडळात एकही महिला नाही : अजित पवारांची सरकारवर टीका 



मुंबई : खरा पंचनामा 

राज्य मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश करण्यात न आल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अजित पवार यांनी राज्य सरकारचे वाभाडेच काढले आहेत. 

ते म्हणाले, एवढा मोठा आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला मंत्री नसणे हे कमीपणाचं वाटतं. महाराष्ट्राच्या सरकारला ते शोभत नाही. मी तर अनेकदा जाहीर सभांमध्ये देखील आणि मीडियातही या गोष्टीचा उल्लेख केला. सभागृहातही उल्लेख केला. काय अडचण आहे माहीत नाही. ही गोष्ट आम्हालाही योग्य वाटत नाही. तमाम महिला वर्गालाही ती गोष्ट योग्य वाटत नाही, असेही पवार म्हणाले. 

अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवर चिंता व्यक्त केली. तसेच या प्रश्नावर विधानसभेत स्थगन प्रस्ताव दिल्याचंही त्यांनी सांगितलं. 6 ते 9 तारखेपर्यंत काही भागात हवामान बदललं जाईल. त्यामुळे अवकाळी पाऊस येईल. वादळ येईल, गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला गेला होता. या अंदाजानुसारच घडत आहे. राज्यात अनेक भागात बळीराजाचं नुकसान झालं आहे. आंब्याचा मोहोर, संत्र्याच्या बागा, द्राक्ष, भाजीपाला, हरभरा, मका, कापूस, ज्वारी, कांदा या सर्वांचं नुकसान झालं आहे, असं अजित पवार म्हणाले. 

काल मी पाथर्डी आणि नगरमध्ये होतो. तिथे काही लोकांनी मला निवेदने दिली. रस्त्याने प्रवास करताना मी शेतीचं झालेलं नुकसानही पाहत होतो. विरोधी पक्षाच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून मागणी करणार आहोत. इतकी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची आहे की, शेतकऱ्यांचं पीक झोपलंय. त्यावर बळीराजा झोपलाय. बळीराजा मुस्काटीत मारून घेत आहे, अशी क्लिप फिरत आहे. सरकार काही मदत करणार नाही, असं त्यांना वाटत आहे, असं ते म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.