Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जुनी पेन्शनसाठी आंदोलन : उच्च न्यायालयात याचिकेवर आज सुनावणी

जुनी पेन्शनसाठी आंदोलन : उच्च न्यायालयात याचिकेवर आज सुनावणी



मुंबई : खरा पंचनामा

जुन्या पेन्शन योजनेसाठी संपावर गेलेले वैद्यकीय, स्वच्छता कर्मचारी आणि शिक्षक यांना संप मागे घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका मुख्य प्रभारी न्या. संजय गंगापूरवाला व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे दाखल केली. या याचिकेवर आज शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

जुन्या पेन्शनसाठी पुकारण्यात आलेला हा संप तत्काळ मागे घेण्याचे आदेश द्यावेत. तसेच संपकऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. तसेच संपकरी संघटना, कर्मचारी आणि संपामुळे बाधित झालेल्या रुग्णांची यादी सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी सदावर्ते यांनी न्यायालयात केली आहे. जुन्या पेन्शन योजनेंतर्गत सरकारी कर्मचाऱ्याला शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के मासिक वेतन मिळते. त्यात कर्मचाऱ्याच्या योगदानाची आवश्यकता नव्हती. ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, यासाठी राज्य सरकारचे लाखो कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे विविध सेवांवर परिणाम झाला आहे.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री व जयंत पाटील अर्थमंत्री असताना ३१ ऑक्टोबर 2005 मध्येच जुनी पेन्शन योजना रद्द करण्यात आली. हा संप बेकायदेशीर असून, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल अधिनियम, 2023 च्या विरोधात आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.