आटपाडीजवळ देशी बनावटीचे पिस्तूल जप्त, दोघांना अटक : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
आटपाडी-आवळाई रस्त्यावर बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल स्कॉर्पिओमध्ये घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, तीन काडतुसे, स्कॉर्पिओ असा साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
परशुराम रमेश करवले (वय २३, रा. साठेनगर आटपाडी, मूळ रा. कराड), रविराज दत्तात्रय गोरवे (वय १९, रा. महुद, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक विशेष पथक तयार केले होते. या पथकातील अधिकारी, कर्मचारी आटपाडी परिसरात गस्त घालत असताना आटपाडी-आवळाई रस्त्यावरील गुरूकूल शाळेजवळ स्कॉर्पिओमध्ये दोघेजण पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.
त्यानंतर पथकाने तेथे सापळा रचून गाडीतील दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल, तीन काडतुसे सापडली. पिस्तूलाबाबत करवले याच्याकडे चौकशी केल्यानंतर गोरवे हा ते पिस्तूल तेथे खरेदी करण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, आटपाडीचे निरीक्षक शरद मेंमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक विशाल येळेकर, सुनील जाधव, मच्छिंद्र बर्डे, अजय बेंद्रे, आयर्न देशिंगकर, संदीप पाटील, प्रकाश पाटील, सचिन कनप आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.