Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जतमधील माजी नगरसेवक खून : बबल्या चव्हाणसह चौघे ताब्यात!

जतमधील माजी नगरसेवक खून : बबल्या चव्हाणसह चौघे ताब्यात!



सांगली : खरा पंचनामा

जतमधील माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खुनप्रकरणी संशयित बबलू चव्हाण याच्यासह चौघांना ताब्यात घेण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केल्याचे समजते. चारही संशयितांना कर्नाटक येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या वृत्ताला रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी दुजोरा दिला नव्हता. दरम्यान पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या आदेशानुसार सांगली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे जतमध्ये ठाण मांडून आहेत.

जत येथे शुक्रवारी दुपारी भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजीराव ताड यांच्यावर गोळीबार करून डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. याप्रकरणी जतमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार संदीप ऊर्फ बबलू चव्हाण याच्यासह एक अनोळखीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विक्रम ताड यांनी फिर्याद दिली आहे. त्याशिवाय फिर्यादीत भाजपचे नगरसेवक उमेश सावंत यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. 

विजय ताड नगरसेवक असताना उमेश सावंत यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र आतापर्यंत खुनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.  शुक्रवारी दुपारी विजय ताड त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या जत-शेगाव रस्त्यावरील शाळेत मुलांना आणण्यासाठी कार घेऊन गेले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. त्यानंतर ताड गाडीतून उतरून घराच्या दिशेने पळत सुटले. त्यावेळी हल्लेखोऱांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात जखमी होऊन ते खाली कोसळल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. शिवाय दगडही घातला. यात ताड यांचा जागीच मृत्यू झाला. 

यातील संशयित संदीप ऊर्फ बबलू चव्हाण हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, लुटमार, चोऱ्या असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय त्याच्यावर एमपीडीए अंतर्गतही कारवाई करण्यात आली होती.

आर्थिक देवघेव, अनैतिक संबंध की राजकीय संघर्ष?
पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांना जत येथे आणण्यात येत आहे. मात्र त्यांच्याकडे अद्याप चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे हा खून अनैतिक संबंधातून झाला की राजकीय संघर्षातून हे स्पष्ट झाले नाही. शिवाय आर्थिक देवघेवीचे कारण आहे का हेही स्पष्ट झालेले नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.