संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार : अंधारे
परळी वैजनाथ : खरा पंचनामा
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी माझ्यावर टीका करताना आर्वाच्य भाषा वापरली, माझी बदनामी केली. या प्रकरणी मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान परळी पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मेळाव्यात सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. ती टीका करत असताना अंधारे यांचा लफडेबाज असा उल्लेख केल्यामुळे शिरसाट यांच्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
दरम्यान, परळी दौऱ्यावर असलेल्या अंधारे म्हणाल्या, आमदार संजय शिरसाट यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. परळी पोलीस ठाण्यात बदनामी केल्याबदल तक्रार दाखल करण्यासाठी त्या गेल्या मात्र पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यास नकार दिला. मी विरोधकांना प्रश्न विचारताना अत्यंत सन्मानाने बोलते, कारण माझ्यावर माझ्या कुटूंबाचे चांगले संस्कार झालेले आहेत. सभ्य व सुसंस्कृत नेतृत्वाच्या आदेशाने मी काम करते. आमदार संजय शिरसाटांना भाऊ म्हणलेले का टोचले? आतापर्यंत अजित पवार यांना दादा म्हणलेले कधी टोचले नाही. कारण ते सज्जन व सभ्य संस्कृतीतील आहेत. ज्यांना सभ्यता कशाशी खातात हेच माहिती नाही त्या शिरसाटांना भाऊ म्हणलेले टोचले असेल. मुळात यांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत गलिच्छ आहे असे त्या म्हणाल्या.
माझ्या पक्षाने विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र कुठेही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. मी कायद्याची अभ्यासक आहे, त्यांनी बोललेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मला चांगला कळतो. त्यामुळे शिरसाटांवर गुन्हा दाखल व्हायलाच हवा. परंतु मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचा पोलिसांवर दबाव आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.