चाळीस हजारांची लाच घेताना पोलिस निरीक्षकास अटक
मुंबई : खरा पंचनामा
दाखल गुन्ह्यातील कलम कमी करून देण्यासाठी आयफोन किंवा एक लाख रूपये लाचेची मागणी करून चाळीस हजारांची लाच स्विकारताना धारावी पोलिस ठाण्यातील प्रभारी पोलिस निरीक्षकास अटक करण्यात आली. मुंबईतील धारावीत लाचलुचपत प्रतिबंध विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली.
विजय शिवदास माने (वय ५३) असे अटक केलेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. धारावी पोलिस ठाण्यात तक्रारदार आणि त्याच्या आईविरोधात फसवणुकीसह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक करण्यात आली होती. सध्या जामिनावर मुक्त आहेत. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान तक्रारदार आणि निरीक्षक माने यांची भेट झाली. त्यावेळी निरीक्षक माने याने तक्रारदाराकडे दाखल गुन्ह्यातील कलमे कमी करण्यासाठी आयफोन किंवा एक लाख रूपये लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर चर्चेअंती चाळीस हजारांवर तडजोड झाली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार विभागाने पडताळणी केल्यानंतर निरीक्षक माने याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शुक्रवारी चाळीस हजारांची मागणी करून ती रक्कम स्विकारताना निरीक्षक माने याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.