काम नाही तर वेतन नाही : शासनाचे परिपत्रक
मुंबई : खरा पंचनामा
'शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत केंद्र सरकारचे काम नाही तर वेतन नाही' हे धोरण राज्य सरकार अंमलात आणत आहे. कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होणे, ही गैरवर्तणूक समजण्यात येत आहे. अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. असा इशाराच राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकात दिला आहे.
जुनी निवृत्ती योजना पुन्हा लागू करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सरकारी कर्माचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. हा संप दिवसेंदिवस तीव्र होत आहे. पण या संपामुळे राज्यातील आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सेवा ठप्प झाल्या आहेत. असे असतानाच कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने कारवाईचे शस्त्र उगारले आहे.
राज्य सरकारने संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनकपातीचा दणका दिला आहे. जेवढे दिवस काम नाही तेवढे दिवस वेतन नाही, अशी कारवाई सरकारकडून केली जात आहे. बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १३ मार्च रोजी परिपत्रक काढले असून संपात सहभागी होणाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.