राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर सांगलीत मस्जिदची मोजणी सुरू
सांगली : खरा पंचनामा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवतीर्थ येथे झालेल्या गुढीपाडव्याच्या सभेत माहिमच्या दर्गाह परिसरातील अनधिकृत बांधकाम आणि सांगलीतील मस्जिदच्या बांधकामाचा उल्लेख केला. त्याची दखल घेत सांगली महापालिकेच्या नगररचना विभागाने ठाकरेंनी उल्लेख केलेल्या मस्जिदची मोजणी सुरू केली आहे.
राज ठाकरे यांनी कालच्या त्यांच्या भाषणात सांगलीतील ज्या अनाधिकृत मस्जिद बांधकामाचा उल्लेख केला. त्या ठिकाणी सांगली महानगरपालिका नगररचना विभागाकडून मोजणी सुरु झाली आहे. या मस्जिदच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, माहिममधील अतिक्रमणदेखील हटवण्यात आलं आहे. खाडीतील मजारच्या जागेवरील झेंडा हटवण्यात आला आहे. तसंच अनधिकृत मजारवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.