भरधाव कारची ट्रकला धडक : तिघेजण जागीच ठार
मुंबई : खरा पंचनामा
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात महामार्गावरील उर्से गावाजवळ झाला आहे. अपघातग्रस्त कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. कारमधील तीन जणांचा यात मृत्यू झाला असून अद्याप या तिघांची नावे समजू शकलेली नाहीत. सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.
उर्से गावाजवळ चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि समोरच्या ट्रकला या कारने पाठीमागून जोरात धडक दिली. या भीषण अपघात चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघातात कारच्या बॉनेटसह पुढील भागाचा चुराडा झाला. कारचा पत्रा कटरने कापून आतील मृतदेह बाहेर काढावे लागले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शिरगाव पोलिसांनी ही वाहतूक कोंडी सोडवली असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास शिरगाव पोलिस करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.