Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सहा जणांची समिती

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सहा जणांची समिती



नवी दिल्ली : खरा पंचनामा

केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमाप्रश्नासाठी दोन्ही राज्यांतून सहा जणांची समिती तयार केली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्रातून मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई व मंत्री दीपक केसरकर, तर कर्नाटक राज्यातून मंत्री गोविंद कारजोळ, मंत्री शशिकला जोल्ले व मंत्री माधुस्वामी यांचा समावेश आहे.

सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात सातत्याने तणावाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची संयुक्त बैठक घेतली होती.

त्यावेळी दोन्ही राज्यात समन्वय असावा आणि सीमाप्रश्नासह इतर विषयांबाबत सातत्याने चर्चा व्हावी, यासाठी दोन राज्यातील प्रत्येकी तीन-तीन जणांची समिती स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले होते. त्यानुसार गृहमंत्रालयाने दोन्ही राज्यांतून नावे देण्याची सूचना केली होती. त्यानुसार दोन्ही राज्यांनी नावे दिल्यानंतर समिती नेमण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी मात्र महामेळाव्याला परवानगी नाकारत अनेक कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारे कर्नाटकाचे अत्याचार कमी व्हावेत, यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी महाराष्ट्रातर्फे करण्यात आली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.