पोलिसांनी दखल न घेतल्याने राज ठाकरेंविरोधात न्यायालयात तक्रार
पुणे : खरा पंचनामा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याची मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभा ही धार्मिक वाद निर्माण करणारी, दंगल भडकवणारी असल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी पिंपरी चिंचवडमधील एका कार्यकर्त्याने पिंपरी न्यायालयात खासगी तक्रारीद्वारे आज केली आहे.
या सभेनंतर वाकड येथील वाजीद रज्जाक सय्यद यांनी काल वाकड पोलिस ठाण्यात राज यांच्याविरुद्ध लेखी तक्रार देत त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी केली होती. पण, पोलिसांनी त्याची दखलच न घेतल्याने त्यांनी ॲड. वाजेदखान बीडकर यांच्यामार्फत पिंपरी न्यायालयात आज धाव घेत खासगी तक्रार दिली. ती दाखल करून घेण्यात आली आहे.
ठाकरे यांनी आपल्या भाषणात माहिम समुद्रकिनाऱ्यावरील अनधिकृत दर्ग्याबाबत वक्तव्य केले होते. ते बांधकाम लगेच पाडून टाकण्यात आले. त्यावरून ठाकरे यांनी फक्त मुस्लिमांचीच अनधिकृत बांधकामे आणि भोंगे दिसतात, असे सांगत त्यांना राज्यात दंगल घडवायची आहे, असे सय्यद म्हणाले.
राज यांचे भाषण हे हिंदू आणि मुस्लिमांत धार्मिक वाद निर्माण करणारे असल्याचा दावा त्यांनी पोलीस आणि न्यायालयातील तक्रारीत केला आहे. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी राज यांनी हिंदू-मुस्लिमांत तेढ निर्माण होऊन रमजानच्या पवित्र महिन्यात देशभर दंगल भडकेल, असे भाषण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.