पोलिस ठाण्याजवळच पतीने केला पत्नीचा खून
पिंपरी : खरा पंचनामा
पिंपरी चिंचवड येथील हिंजवडी परिसरात पोलिस ठाण्यासमोरच महिलेचा खून करण्यात आला आहे. आयटी कंपनीसमोरील फुटपाथवर महिलेचा खून झाल्याने एकच खळबळ माजली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर ही खून झाल्याने चर्चा रंगली होती. स्वाती राठोड असं मृत महिलेचे नाव आहे. स्वातीच्या पतीने चाकूने भोसकून खून केल्याची माहिती समोर आली आहे.
स्वाती राठोड ही कामगार महिला असून ते हिंजवडी परिसरामध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी आली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हिंजवडी पोलीस स्टेशन वरील फुटपाथवर हा खून झाला आहे. काल रात्री उशिरा ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.
एवढंच नाही तर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हा खून झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.