Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हुपरीतील कालव्यात जळालेल्या कारमध्ये आढळला मृतदेह

हुपरीतील कालव्यात जळालेल्या कारमध्ये आढळला मृतदेह



इचलकरंजी : खरा पंचनामा

हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखान्याच्या पूर्वेस असणाऱ्या कालव्यात जळलेल्या मारुती कारमध्ये एक मृतदेह आढळला. याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. शनिवारी सकाळी पोलिसांना निनावी फ़ोनद्वारे काही दिवसापूर्वी कार कालव्यात पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने कार कालव्यातून बाहेर काढली. कार जळालेल्या अवस्थेत असुन आत एका तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आहे.

हुपरी परिसरातील एक तरुण गेल्या चार महिन्यापासून बेपत्ता असल्याची माहिती असुन या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.