Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लाच स्वीकारणाऱ्या भूमापनच्या अव्वल कारकूनाला सक्तमजुरीची शिक्षा

लाच स्वीकारणाऱ्या भूमापनच्या अव्वल कारकूनाला सक्तमजुरीची शिक्षा



सांगली : खरा पंचनामा

प्लॉट विक्रीसाठी ना हरकत दाखला देण्यासाठी 12 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या भूमापनच्या अव्वल कारकूनाला 4 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी आज या खटल्याचा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील माधव कुलकर्णी यांनी काम पाहिले.

वसंत दत्तात्रय मिरजकर (वय 55, रा. कवठेमहांकाळ) असे शिक्षा झालेल्या कारकुनाचे नाव आहे. याबाबत प्रसाद मोहिते यांनी फिर्याद दिली होती. मोहिते यांचे प्लॉट विक्री करण्यासाठी त्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात ना हरकत दाखल्यासाठी प्रस्ताव दिला होता. मोहिते यांना तो दाखला देण्यासाठी मिरजकर याने 15 हजारांची लाच मागून 12 हजार स्वीकारले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विजय सारकुभन, व्ही. डी. बाबर यांच्यासह पथकाने मिरजकर याला लाच घेताना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्या. शर्मा यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. यावेळी 5 साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा दाखल करण्यास सक्षम प्राधिकारी म्हणून परवानगी देणारे तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची साक्ष महत्वाची ठरली. याप्रकरणी न्यायालयाने मिरजकर यास दोषी ठरवत मिरजकर याला 4 वर्षे सक्तमजुरी, 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.