Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेतील गांजाचा 'गुरुजी' अखेर जेरबंद!

मिरजेतील गांजाचा 'गुरुजी' अखेर जेरबंद!



सांगली : खरा पंचनामा

गांजा तस्करीची पाळेमुळे खोदून काढण्यात एलसीबीला यश आले आहे. कवठेपिरान येथे 102 किलो गांजा सापडल्यानंतर पोलिसांनी यातील तस्कर, विक्रेते, एजंट यांचा पर्दाफाश केला आहे. परराज्यातील गांजाची तस्करी करून सांगली जिल्ह्यात त्याची एजंट मार्फत विक्री करणारा गांजाचा गुरुजी जेरबंद झाला आहे. त्यामुळे गांजा विक्री, तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे एलसीबीच्या पथकाने दि. 22 फेब्रुवारी रोजी 102 किलो गांजा जप्त केला होता. याप्रकरणी चौघांना अटकही करण्यात आली होती. ही कारवाई केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी या व्यवसायाची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना दिले होते. शिवाय गांजा जेथून आणला त्या राज्यात जाऊन तपास करण्याचे आदेशही दिले होते.

त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी एक पथक ओडिशा येथे पाठवले होते. तेथील गांजा माफियाला अटकही करण्यात आली. त्याला सांगलीत आणल्यावर त्याने मिरजेतील गुरुजीला माल पुरवत असल्याचे सांगितले. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने मिरजेतील या गुरुजीच्या मुसक्या आवळल्या. गांजा व्यवसायातील सर्वात मोठी हस्ती सांगली पोलिसांनी प्रथमच अटक केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गांजा विक्रेते, तस्कर यांचे धाबे दणाणले आहेत.

या गुरुजीची मुले मेट्रो पोलिटीन शहरात उच्च शिक्षण घेत आहेत. त्याच्या घरातील सर्वजण उच्च शिक्षित आहेत. तरीही हा गुरुजी अनेक वर्षे याच व्यवसायात आहे. गुरुजीने विकलेल्या गांजामुळे चांगल्या घरातील अनेक मुले परदेशात उच्च शिक्षणासाठी संधी असूनही गांजाच्या व्यसनामुळे जाऊ शकले नाहीत. स्वतःच्या मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या या गुरुजीने सामान्य लोकांची घरे उध्वस्त केली आहेत. त्याला जेरबंद केल्याने अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान या गुरुजीला सोडवण्यासाठी अनेकांनी दबाव टाकला. मात्र पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांचे भक्कम पाठबळ असल्याने पोलिसांनी त्याला भीक न घालता गुरुजीच्या मुसक्या आवळल्याच.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.