सांगलीत मोबाईल, सायकल चोरट्यास अटक : एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहरात विविध ठिकाणाहून मोबाईल, सायकल चोरणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचे 2 मोबाईल, 8 सायकली असा 62 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
चैतन्य अशोक पुजारी (वय 25, रा.वाल्मिकी आवास योजना, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश एलसीबीला दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक विशेष पथक तयार केले होते.
मंगळवारी एक तरुण चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी सांगलीतील बाजारपेठेत येणार असल्याची माहिती निरीक्षक शिंदे यांना खबऱयाद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने मोबाईल आणि सायकली चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 2 मोबाईल, 8 सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून 3 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, संदीप शिंदे, संदीप पाटील, सागर टिंगरे, विक्रम खोत, संतोष गळवे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.