मुश्रीफ यांच्या ईडी चौकशीचे ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार
मुंबई : खरा पंचनामा
कागलचे आमदार हसन मुश्रीफ चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. त्यांच्या चौकशीचे आता ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. मुश्रीफ यांनीच चौकशीला हजर होण्यापूर्वी तशी मागणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. ती ईडीने मान्य केली आहे. त्यानुसार त्यांच्या चौकशीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जात आहे.
हसन मुश्रीफ यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुश्रीफांनी आज ईडी कार्यालयात दाखल होताच चौकशी अधिकाऱ्यांना पत्र लिहून काही मागण्या केल्या होत्या. या मागण्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्या आहेत. त्यानुसार आता मुश्रीफांची चौकशी होत असताना ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्ड केले जात आहेत.
मुश्रीफांनी पत्राद्वारे मागणी केली होती की, कायद्याच्या तरतुदीनुसार माझी चौकशी सुरु असताना आपल्या विधानांची ऑडिओ/व्हीडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावं. तसेच स्टेटमेंट रेकॉर्ड होत असताना आपले वकील अजित सोनी आणि प्रशांत पाटील यांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही मुश्रीफांकडून करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.