राज्यातील पहिली तृतीयपंथीयांची साताऱ्यात पोलीस भरती
सातारा : खरा पंचनामा
महाराष्ट्र राज्यात सध्या पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे प्रथमच तृतीयपंथीयांना पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. या भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी देखील अर्ज केले आहेत. साताऱ्यात तृतीयपंथीयांची पहिली पोलीस भरती पार पडली असून यामध्ये आर्या पुजारी, भूषण शिंदे आणि सतीश पाटील यांची मैदानी चाचणी घेण्यात आली.
साताऱ्यात तृतीयपंथीयांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानुसार तीन तृतीयपंथीयांची मैदानी चाचणी घेण्यात आली. साताऱ्याच्या आर्या पुजारी यांनी पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांसाठी जागा उपलब्ध करावी यासाठी न्यायालयीन लढा दिला होता. त्याला यश मिळाले आहे. साताऱ्यात या तीन जणांच्या भरतीसाठी 70 हून अधिक पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
त्या तीन तृतीयपंथीयांची 100 मीटर, 800 मीटर धावणे, गोळा फेक अशी मैदानी चाचणी घेण्यात आली. या मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी माध्यमांना दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.