संजय राऊत यांच्यावर बार्शीत गुन्हा दाखल
सोलापूर : खरा पंचनामा
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील घटनेचा आक्षेपार्ह फोटो ट्विट केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्यावर बार्शी येथे गुन्हा दाखल झाला आहे. राऊत यांनी ट्वीटरवर एका अत्याचारपीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतला फोटो शेअर केला आहे.
"देवेंद्रजी, हे चित्र बार्शीतले आहे.. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ? ५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत." असे राऊत यांनी फोटोसोबत ट्विट केले होते.
यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया दिली होती. हा व्हिडीओ त्यांनी आपल्या अधिकृत खात्यावरुन ट्वीट केला होता. आपल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी संजय राऊतांनी हा फोटो व्हायरल केल्याबद्दल आक्षेप घेतला होता. तसंच महिला आयोगाला कारवाई करण्याची मागणीही केली होती.
चित्रा वाघ यांनी गृहविभाग आणि मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत संजय राऊतांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.