Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या नावे उकळले पैसे

आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या नावे उकळले पैसे



छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

ऑनलाइन भामट्याने चक्क एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाने पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये बनावट ट्विटरवर अकाऊंट तयार करून पैसे उकळण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने हे पैसे उकळण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बनावट खात्यावरून सायबर भामट्याने देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांकडून पैसे उकळले असल्याचा  प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

थेट पोलिस अधिकाऱ्यांच्या नावानेच पैसे उकळवण्यात आल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्यात विशेष म्हणजे नेहमी चर्चेत असलेल्या मोक्षदा पाटील यांच्या नावाने हा गंडा घालण्यात आला आहे. एका ऑनलाइन भामट्याने महिला आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्विटरवर खाते तयार केले होते. त्यामध्ये त्याने अनेक आयपीएस अधिकाऱ्यांना मेसेज केले असल्याचे समोर आले आहे. त्यात त्याने गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठीचे मेसेज केल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यामध्ये मोक्षदा पाटील यांचे अकाऊंट असल्याचे भासवत त्याने विश्वास संपादन करून फोन पे च्या माध्यमातून पैसे मागविले आहे. यामध्ये ऑनलाइन भामट्याने मदतीच्या नावाखाली केलेली लूट पाहून पोलिस दलात खळबळ उडाली आहे. थेट पोलिसांच्याच नावाने लूट करण्याचे धाडस कुणी केले याबाबत पोलिस शोध घेत आहे.

मोक्षदा पाटील यांच्या ओळखीतील काही अधिकाऱ्यांना पैसे मागितल्याचा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी खात्री साठी विचारणा केली होती. त्यावरून हा प्रकार समोर आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. सायबर पोलिस संशयित व्यक्तीच्या मागावर आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.