रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात
मुंबई : खरा पंचनामा
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी रिसॉर्टचे मालक आणि उद्योजक सदानंद कदम यांना आज शुक्रवारी पहाटे ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. माजी मंत्री रामदास कदम यांचे ते बंधू आहेत. याबाबत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ईडीचे पथक कदम यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रिसॉर्टचा मुद्दा समोर असला तरी एका राजकीय पक्षाच्या सभेला आर्थिक पाठबळ दिल्यामुळे या कारवाईला वेग आला असल्याची चर्चा आहे. दापोली येथील साई रिसॉर्टने मोठी राजकीय खळबळ उडवली आहे. या रिसॉर्टची वेगवेगळ्या पातळीवर चर्चा आहे. या प्रकरणी ईडीकडून एका उद्योजकाला ताब्यात घेण्यात आले असल्याची चर्चा आहे. विविध उद्योगात यशस्वी असलेल्या या उद्योजकावर राजकीय वक्रदृष्टी असल्याने अशा पद्धतीची कारवाई अपेक्षितच केली जात होती.
रिसॉर्ट हे समोर दिसणारे कारण असले तरी त्यामागे अन्य काही कारणेही असल्याचीही चर्चा आहे. एका राजकीय पक्षाच्या सभेला माणसे आणण्यासह सर्व प्रकारचा खर्च या उद्योजकाने केला आहे. राजकारणात कोठेही थेट सहभाग नसलेल्या या उद्योजकाचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे या कारवाईला अधिक गती देण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.