मुश्रीफांपाठोपाठ अनिल परबही ईडीच्याविरोधात उच्च न्यायालयात
मुंबई : खरा पंचनामा
माजी मंत्री आणि कागलचे आमदार यांच्या घर, कायार्लयावर ईडीने तीनदा छापे टाकल्यानंतर मुश्रीफ आक्रमक झाले आहेत. ईडीने केलेल्या कारवाईविरोधात मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. आता त्यांच्या पाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीच्या रडारवर असलेले माजी मंत्री अनिल परब यांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
अनिल परब यांचे व्यावसायिक भागिदार आणि सहकारी सदानंद कदम यांना साई रिसॉर्ट प्रकरणी अटक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर परब यांनी सोमवारी उच्च न्यायलयात धाव घेतली आहे. ईडीने दाखल केलेली तक्रार रद्द करावी अशी मागणी परब यांनी केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच याचिका प्रलंबित असेपयर्त ईडीला कारवाईपासून रोखण्याची मागणीही त्यांनी केली आहे. परब यांच्या याचिकेवर आज मंगळवारी न्या. रेवती मोहिते-डेरे, न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
२०११ मध्ये पुण्यातील विभास साठे यांनी दापोली येथे शेतजमीन खरेदी केली. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी ती जागा परब यांना १ कोटी ८० लाख रूपयांना विकली. त्याबाबतचा करार २०१९ मध्ये करण्यात आला. या रकमेतील ८० लाख रूपये परब यांनी रोख स्वरूपात साठे यांना दिली. त्यानंतर परब यांनी त्या जागेवर रिसॉर्ट बांधून ते सदानंद कदम यांना विकले. ही जागा शेतीसाठी आरक्षित होती. जमिनीचे आरक्षण बदलण्यासाठी कदम यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून १२ सप्टेंबर २०१७ रोजी आरक्षण बदलून घेतले असा दावा ईडीने केला आहे.
तसेच कदम यांनी परब यांच्या संगनमताने आणि पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधले. या बेकायदा बांधकामामुळे समुद्र किनाऱ्यावरील पय
पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा दावाही ईडीने केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.