Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

काँग्रेसच्या नेत्याला स्पीड पोस्टद्वारे ईडीची नोटीस

काँग्रेसच्या नेत्याला स्पीड पोस्टद्वारे ईडीची नोटीस



नांदेड : खरा पंचनामा

एकीकडे देशभरात ईडीच्या कारवाया सुरू असतानाच नांदेडमध्ये काँग्रेसच्या नेत्याला ईडीची नोटीस आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांना स्पीड पोस्टने ईडीची नोटीस मिळाली.

शमीम अब्दुल्ला यांनी ईडीच्या मुंबई कार्यालयात नोटीसबाबत चौकशी केली, तेव्हा अशी कोणतीही नोटीस पाठवली नसल्याचं ईडीच्या कार्यालयातून सांगण्यात आलं, असा दावा शमीम अब्दुल्ला यांनी केला आहे. या नोटीसबाबत शमीम अब्दुल्ला यांनी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महापालिकेच्या गुंठेवारी प्रकरणामध्ये ईडीची चौकशी सुरू आहे. नांदेड महापालिकेत गुंठेवारी विभागातील बनावट प्रमाणपत्र दिल्याचा घोटाळा उघड झाला होता. गुंठेवारी विभागातील अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते. गेल्या डिसेंबर मध्ये या प्रकरणात नांदेड मधील वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा देखील झाला होता.

जानेवारी मध्ये ईडीच्या नागपूर येथील पथकाने नांदेड पालिकेत चौकशी देखील केली होती. बनावट गुंठेवारीच्या अनेक फाईल नागपूरच्या ईडी पथकाने ताब्यात घेतल्या होत्या. याच संदर्भात आज शमीम अब्दुल्ला यांना नोटिस आली. विशेष म्हणजे चौकशी ईडीच्या नागपूर पथकाकडे आणि नोटीस आली मुंबई कार्यालयातून, त्यामूळे संभ्रम निर्माण झाला.

दरम्यान शमीम अब्दुल्ला यांच्या तक्रारीची चौकशी सुरू असून फेक नोटीस असेल तर कारवाई केली जाईल असं पोलीसांनी सांगितलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.