अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या तिघांना अटक
शिरोळ : खरा पंचनामा
शिरोळ तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी 24 तासात अटक केली. कुरुंदवाड पोलिसांनी ही कारवाई केली.
प्रशांत शिंदे, स्वरूपानंद कांबळे, यल्लापा मोरडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रविवारी रात्री साडेदहा वाजता सुमारास पीडित अल्पवयीन मुलीला प्रशांत शिंदे याने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले होते. त्यासाठी स्वरूप कांबळे, यल्लाप्पा मोरडे या दोघांनी शिंदे याला मदत केली होती. याबाबत पीडित मुलीच्या पालकांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासले. त्यावेळी संशयित कराड येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने कराड येथून कांबळे आणि मोरडे या दोघांना तर किणी- वाठार बस स्थानक चौकातील महामार्गावरून अल्पवयीन मुलगी आणि शिंदे या दोघांना सापळा रचून सोमवारी रात्री 10 च्या सुमारास अटक केली. पोलिसांनी दोन दुचाकी व एक कार जप्त केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.