जुन्या पेन्शन योजनेसाठी कोल्हापुरात मोर्चा
कोल्हापूर : खरा पंचनामा
राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनीही जून्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) मोडीत काढून, जुनी पेन्शन सर्वांनाच लागू करण्यात यावी, या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा महामोर्चा काढण्यात आला.
काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्च्यामध्ये हजारो शासकीय कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीयही सहभागी झाले आहेत. 'एकच मिशन जुनी पेन्शन' अशा घोषणा देत हे आंदोलन केल जात आहे.
सरकारी अधिकारी मंचाचे राज्य संघटक अनिल लवेकर म्हणाले, "राज्य सरकारने 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी आमची मागणी आहे. सध्याची पेन्शन योजना एका महिन्याचे औषध खरेदी करण्यासाठीही अपुरी आहे. पाच राज्यांनी जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे."
तमिळनाडू, ओरिसा, राजस्थान या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होत असेल तर, महाराष्ट्रात का नाही असा सवाल उपस्थित करत आमदार सतेज पाटील यांनी, महाराष्ट्र सरकारने दुटप्पीपणा करू नये, असा हल्लाबोल राज्य सरकारवर केला आहे.
या मोर्चात आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार राजू आवळे, आमदार जयश्री जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने शासकीय कर्मचारी सहभागी झाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.