पतीच्या खुनात फितूर झालेल्या फिर्यादी पत्नीवर फौजदारी कारवाईचे आदेश
सांगली : खरा पंचनामा
थबडेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे झालेल्या एकाच्या खून प्रकरणा फिर्यादी असलेल्या मृताच्या पत्नीने न्यायालयात आरोपी पक्षाशी संगनमत करून फितूर होऊन जबाब दिला. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी फितूर साक्षादीरावर प्रिज्युरी अनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३४० प्रमाणे कारवाई करण्याचा आदेश दिला.
थबडेवाडी येथे दि. २० ऑगस्ट २०२१ रोजी सुवर्णा भरत खोत (वय २५) यांनी त्यांचा पती भरत ज्ञानदेव खोत (वय ३५) याचा घरासमोरच धारदार शस्त्राने तोंडावर, डोक्यावर वार करून खून केल्याची फिर्याद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात दिली होती. भरत खोत याचे भावकीतीलच एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्या महिलेचा नातेवाईक आणि त्याचा मित्र अशा दोघांनी खून केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस अनेकदा प्रयत्न करूनही जामीन मिळाला नाही. त्यातील एक आरोपी कारागृहात होता. अशी वस्तुस्थिती असताना मृताची पत्नी सुवर्णा खोत यांचा न्यायालयात शपथेवर जबाब झाला. यावेळी मूळ फिर्यादी असणारी मृताची पत्नी सुवर्णा, वर्दीदार फितूर होऊन आरोपी पक्षाशी संगनमत करून जबाब दिले. त्यामुळे सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रियाज जमादार फितूर फिर्यादीचा कौशल्यपूर्वक उलट तपास घेतला.
त्यात फिर्यादी खोटी साक्ष देत असल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट झाले. यावेळी सरकारी पक्षातर्फे प्रिज्युरी अनुषंगाने केस लॉ सादर केले. फितूर झालेल्या साक्षीदारामुळे आरोपीस शिक्षा होऊ शकत नाही. तसेच खरेखुरे न्यायदान होऊ शकत नाही. त्यामुळे फितूर साक्षीदाराची गय करू नये असा युक्तीवाद ऍड. जमादार यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने फितूर साक्षीदारास फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३४० प्रमाणे चौकशी कारवाईचा आदेश पारित करून फिर्यादीस नोटीस काढल्याचे ऍड. जमादार यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.