विनयभंग करून पसार झालेल्या निलंबित पोलिस उपनिरीक्षकास अटक
सांगली : खरा पंचनामा
एका विवाहितेला तिच्या वयाच्या अकराव्या वर्षापासून सलग चौदा वर्षे त्रास देऊन विनयभंग करणाऱ्या आणि गेल्या काही महिन्यांपासून पसार असलेल्या निलंबित पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली.
शंकर जयवंत पाटणकर (वय 32, रा. बोरगाव, ता. वाळवा) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तो मुंबई पोलिस दलात कार्यरत होता.
पीडित विवाहितेने 15 दिवसांपूर्वी शंकर पाटणकर याच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून पाटणकर पसार झाला होता.
पाटणकर याने पीडित महिलेचा जानेवारी 2009 ते फेब्रुवारी 2023 अशा चौदा वर्षांच्या काळात मानसिक छळ करुन विनयभंग केला होता.
तू मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर असे म्हणत आरोपी पाटणकर अश्लिल हावभाव करत होता. तसेच पीडित महिलेच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करुन स्वत: विवस्त्र होऊन महिलेकडे अशीच मागणी करत होता. याशिवाय दुचाकी आणि चारचाकीमधून महिलेचा पाठलाग करत करणे, भररस्त्यात हात धरणे, मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य पाटणकर याने केले.
याबाबत पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर तो फरार झाला होता. त्याला अटक करण्यात आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.