Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अमृता फडणवीस यांची डिझायनर विरोधात तक्रार : दोघांवर गुन्हा

अमृता फडणवीस यांची डिझायनर विरोधात तक्रार : दोघांवर गुन्हा



मुंबई : खरा पंचनामा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझानयर विरोधात तक्रार दाखल केली आहे. धमकी आणि कट रचल्याचा आरोप त्यांनी दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

डिझायनर अनिक्षा आणि तिचे वडील यांच्याविरूद्ध मुंबई पोलिसांत फडणवीस यांनी तक्रार दाखल केली आहे. १ कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. मलबार हिल पोलीस ठाण्यात अमृता फडणवीसांनी २० फेब्रुवारीला तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अनिक्षा आणि त्यांची नोव्हेंबर २०२१ साली पहिल्यांदा भेट झाली होती. अनिक्षाने सांगितलं की, ती कपडे, दागिन्यांची डिझायनर आहे. तिने डिझाईन केलेले कपडे आणि दागिने सार्वजनिक कार्यक्रमात घालावे, अशी विनंती केली होती. यानंतर सागर बंगला आणि विविध कार्यक्रमात अनिक्षाशी भेट झाली, असे फडणवीसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

२७ जानेवारी २०२३ रोजी पुण्यातल्या एका कार्यक्रमात अनिक्षा तिथे भेटली. कार्यक्रम झाल्यावर अनिक्षाला कारमध्ये बसवलं. तेव्हा बोलताना अनिक्षाने म्हटलं की, तिचे वडील पोलिसांना बुकींबाबत माहिती देत होते. त्यानुसार, पोलिसांना सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन पैसे कमवू शकतो. कारवाई न करण्यासाठीही सट्टेबाजांकडून पैसे घेऊ शकतो. यानंतर अनिक्षाला कारमधून खाली उतरवलं, असही तक्रारीत नोंद केले आहे.

१६ फेब्रुवारीला रात्री ९.३० च्या दरम्यान अनिक्षाने फोन केला. तेव्हा सांगितलं की, तिच्या वडिलांना एका प्रकरणात आरोपी करण्यात आलं आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक कोटी रूपये देण्याची तयारी आहे. हे ऐकताच फोन कट करत तिचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर १८ फेब्रुवारीला रात्री ११.५५ ते १२.१५ च्या दरम्यान २२ व्हिडीओ क्लीप, तीन व्हॉईस नोटस अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅपवर आले, असं अमृता फडणवीसांनी तक्रारीत म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.