Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राजारामपुरीतील सराईत गुन्हेगार स्थानबद्ध

राजारामपुरीतील सराईत गुन्हेगार स्थानबद्ध 



कोल्हापूर : खरा पंचनामा 

कोल्हापूर शहरातील राजारामपुरी, दौलतनगरसह उपनगरीय भागात सावर्जनीक सुव्यवस्थेत वारंवार बाधा आणणाऱ्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली. 

अजय अनिल पाथरवट (रा. दौलतनगर, कोल्हापूर) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला कळंबा मध्यवर्ती कारागृहात एक वषार्साठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत सावर्जनीक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या तसेच गुंडांसह अवैध व्यावसायिक, टोळ्या यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत. त्यानुसार राजारामपुरीचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी अजय पाथरवट याच्याविरोधात एमपीडीएअंतर्गत कारवाईसाठी उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. 

त्या प्रस्तावाची छाननी करून पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्या मान्यतेने तो प्रस्ताव कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी रेखावार यांनी नुकताच तो प्रस्ताव मंजुर केला आहे. त्यानुसार निरीक्षक तनपुरे यांनी पाथरवट याला कळंबा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.