राज ठाकरे यांच्या विरोधात पुण्यात पोलिसांत तक्रार दाखल
पुणे : खरा पंचनामा
गुढी पाडव्यानिमित्त मुंबईत शिवाजीपार्कवर राज ठाकरे यांचं भाषण झाले. सभेतील या भाषणामुळं राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. पुण्यात त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळं त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी होत असून वाकड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वाजीद रजाक सय्यद यांनी ही तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे. गुढी पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी काल मुंबईत भाषण केलं, या भाषणामुळं दोन समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करा असं तक्रारीत नमूद केलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.