Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सलमानने माफी नाही मागितली तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू!

सलमानने माफी नाही मागितली तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू!



दिल्ली : खरा पंचनामा

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खान याने माफी मागावी. पण त्यानं माफी मागितली नाही तर मग आम्हाला आमच्या पद्धतीनं कारवाई करावी लागेल. अशा शब्दांत लॉरेन्स बिष्णोईनं धमकी दिली आहे. ही धमकी नसून आमची विनंती आहे की त्यानं माफी मागावी असं लॉरेन्सनं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने हे वक्तव्य केले आहे.

प्रख्यात पंजाबी गायक सिद्ध मुसेवालाच्या हत्येनं मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली होती. या हत्याकांडातील प्रमुख संशयित गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं मोठा खुलासा केला आहे. त्यानं दिलेल्या एका मुलाखतीतून हत्याकांड आणि त्याचं बॉलीवूडचं कनेक्शनही समोर आले आहे.

एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीतून लॉरेन्सनं काही धक्कादायक खुलासे केले आहेत. आपण सलमानला जीवे मारण्याची धमकी का दिली याविषयी त्यानं सांगितलं आहे. सिद्धु मुसेवालाच्या हत्याकांड प्रकरणात लॉरेन्सवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. बिश्नोईनं सांगितलं की, काळवीट शिकार प्रकरणात सलमानकडून चूक झाली होती. त्याप्रकरणात सलमाननं आमच्या समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या होत्या. आमची अपेक्षा होती की, त्यानं एकदा का होईना माफी मागावी. मात्र तसे झाले नाही. त्यानं काही माफी मागितली नाही. 

मुंबई पोलिस माझी चौकशी करण्यासाठी आले होते. मी चिठ्ठी पाठवल्याचे म्हणतात पण तसे काही नाही. ती चिठ्ठी काही सापडली नाही. आम्ही बाकी कुणाला काही बोललो नाही. तेव्हा आमचे जे म्हणणे ते लक्षात घ्यावं. सलमाननं या गोष्टीचा विचार करावा. आमच्या समाजाचा त्यानं अपमान केला आहे. मला काही समाजाचा पाठींबा नाही. पण मला वाटतं की, त्यानं नेहमी अपमानित केलं आहे. त्यामुळे त्यानं माफी मागाव असे वाटते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.